जागतिक पाणथळ भूमी दिन  ३ फेब्रुवारी २०१८

पर्यावरण दक्षता मंडळ ही स्वयंसेवी संस्था गेली १८ वर्षे ठाणे शहरात पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य करीत आहे. पाणथळ जागांविषयी संशोधक, स्थानिक, नागरिक व मच्छीमार समाज इ. समाजात जनजागृती करण्याचे काम ही संस्था करत आहे. ठाणे स्वच्छ खाडी अभियानांतर्गत दरवर्षी जागतिक पाणथळभूमी दिनानिमित एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते. यावर्षी ही परिषद ३ फेब्रुवारी २०१८ रोजी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स and इंजिनियरिंग, विद्याविहार येथे आयोजित करण्यात आला होता. हे या राष्टीय परिषदेचे १२ वे वर्ष असून “Wetlands for sustainable urban future.” अशी यावर्षीची संकल्पना होती.

३ फेब्रुवारी २०१८ रोजी स. ११:०० वा. नियोजित महाविद्यालयात या परिषदेला सुरुवात झाली. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एकनाथ मुळे (President, Indian association of aquatic biology), डॉ. संजय जोशी (प्रा. के. जे. सोमय्या, महाविद्यालय) डॉ. नीलिमा कुलकर्णी (नि. प्राध्यापिका, वझे महाविद्यालय) प्रा. विद्याधर वालावलकर (उपाध्यक्ष, पर्यावरण दक्षता मंडळ) डॉ. सुगंधा शेट्ये (प्रा. के. जे. सोमय्या महाविद्यालय) आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली. त्यानंतर मोनालिसा मुखर्जी या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून परिषदेची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली. १० पेक्षा जास्त  महाविद्यालये तसेच शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी या परिषदेमध्ये सहभाग घेतला.

परिषदेच्या उद्घाटन सत्रात डॉ. संजय जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत करून पर्यावरण दक्षता मंडळाच्या कार्याची थोडक्यात माहिती सांगितली तसेच डॉ. सुगंधा शेट्ये यांनी के. जे. सोमय्या कोलेजची थोडक्यात माहिती देऊन महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागातर्फे पाणथळभूमीसाठी काम केले जाते, याबाबत सांगून पर्यावरण शाळा या विभागातून या वर्षापासून नवीन बblog सुरु केला आहे हेही सांगितले. यानंतर श्रुष्टी येला या विद्यार्थिनीने या blog विषयी सविस्तर माहिती दिली व blog चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष श्री. वालावलकर यांनी “ठाणे खाडी स्वच्छता अभियान” या मोहिमेबाबत माहिती दिली. या नंतर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले डॉ. एकनाथ मुळे यांनी आपल्या भाषणातून त्यांनी केलेल्या भारतभ्रमंती मध्ये विविध ठिकाणातील पाणथळभूमीचा अभ्यास करताना त्याना आलेले अनुभव उपस्थितांसोबत व्यक्त केले तसेच आपल्या PPT सादरीकरणाद्वारे देशभरातील पाणथळ जागांची सविस्तर माहिती दिली.

परिषदेच्या दुपारच्या सत्रात डॉ. नीलिमा कुलकर्णी यांनी ठाणे व मुंबईतील झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणाचा झपा􀁫याने वाढणा􀂅या पाणथळभूमीवर कसा दुष्परिणाम होत आहे व  त्यातील जैवविविधतेला कशा पद्धतीने धोका निर्माण होत आहे याबद्दल सविस्तर आढावा आपल्या ppt presentation द्वारे सर्वांसमोर मांडला. यानंतर पदवी आणि पदव्युत्तर विभागातून एकूण 5 शासकीय पेपर मांडण्यात आले तर याच विभागात ४ भित्तीपत्रके सदर करण्यात आली. यानंतर श्री. दयानंद स्टालिन यांनी मुंबई व ठाणे या ठिकाणी असलेल्या पाणथळ जागांची सद्यस्थितीबाबत माहिती देऊन मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शहरीकरणाचा पाणथळ जागांवर होणाऱ्या वाईट परिणामांची जाणीव करून दिली तसेच ठाणे, उरण या भागात होत असलेल्या विकासात मोठ्या प्रमाणात पाणथळ जागेचा वापर होत असून या जागा धोक्यात आल्या आहेत व तेथील जैवविविधता लोप होत आहे असे सांगून पाणथळ जागेच्या संवर्धनाची अत्यंत गरज आहे असे सांगितले.

समारोप सत्राला विविध स्पर्धांचे परीक्षण केलेल्या परीक्षकांचे सत्कार करण्यात आले तसेच स्पर्धांचा निकाल जाहीर करून विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच श्री. कमलाकर इंदुलकर, ATBS यांनी शाळा व महाविद्यालयातील पाणथळभूमी निमित घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्याना प्रा. प्रवीण नाईक यांच्याकडून बक्षिसे प्रदान करण्यात आली. पर्यावरण दक्षता मंडळाचे डॉ. संजय जोशी यांनी परिषदेचा समारोप करून उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने या परिषदेचा समारोप करण्यात आला.