पर्यावरण दक्षता मंडळ ही स्वयंसेवी संस्था पर्यावरण शिक्षण, जनजागृती आणि संशोधन या क्षेत्रात २१ वर्षे कार्यरत आहे. ग्रीन लव्हर्स क्लब या उपक्रमात बागकामाचे विविध तंत्र आणि पद्धती असा १ वर्षाचा कोर्स असून आपण घरगुती बागेसंदर्भात मार्गदर्शन करणार आहोत. ७ वर्षे यशस्वीपणे हा कोर्स पर्यावरण दक्षता मंडळ राबवत आहे. जनसामान्यांमध्ये झाडांची वाढ आणि त्यांचे संवर्धन करण्याचे तंत्र विकसित व्हावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. एक वर्ष चालणाऱ्या या मार्गदर्शन वर्गाची सुरवात जुलै महिन्याच्या दुस–या शनिवार पासून होणार आहे. ह्या उपक्रमात टेरेस गार्डन, किचन गार्डन, गुलाब, कुंड्यांमध्ये फळझाडांची लागवड, झाडांना लागणा–या किडी आणि त्यावर उपाय इत्यादी विषयांवर दर महिन्याच्या दुस–या शनिवारी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन वर्ग चालवण्यात येणार आहे. यावेळी तज्ञांचे थेट मार्गदर्शन आणि सरतेशेवटी आपल्या शंकांचे निरसन सुद्धा होणार असून १२ महिने चालणा–या या उपक्रमाचे सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जागा मर्यादित असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
सकाळी १० ते ६ या वेळेत खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
संपर्क :९५९४१७४६५३ / ९८३३०४६६३४