आपलं पर्यावरण लघुचित्रपट महोत्सव २०१९

आपलं पर्यावरण लघुचित्रपट महोत्सव २०१९

पर्यावरण दक्षता मंडळातर्फे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांकरिता विशेष पर्यावरण चित्रपट महोत्सव डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येतो. दिनांक ४ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९ते ११ आणि दुपारी १२ ते २ या कालावधीत गडकरी रंगायतनमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण चित्रपट महोत्सव आयोजित केला आहेआपल्या शाळेतील ७ वी व ८ वी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकता. तरी आपण त्वरित या विद्यार्थ्यांची संख्या आम्हाला ईमेल किंवा फोनद्वारे कळवावी. 

सदर महोत्सव विनामूल्य असून आपणास विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या शाळेचे नाव नोंदविण्यात यावे. 

धन्यवाद.