२१ मार्च जागतिक वनदिन

पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित,
२१ मार्च जागतिक वनदिनानिम्मित 
 
हिरव्या हाताचे संमेलन 
वनस्पती हा निसर्गातला एकमेव घटक आहे जो सूर्यप्रकाशाचे अन्नात रूपांतर करतो आणि सर्व सृष्टीचे पोषण करतो .झाडे प्राणवायू देतात, थंडावा देतात,  जमिनीतील माती , पाणी,धरून ठेवतात. अशा या वनस्पतींची,  वनांची महती किती वर्णावी. सध्याच्या काळात या वनस्पती, जंगले  कमी कमी होत चालली आहेत , कारणे आपण जाणताच. म्हणून जाणीवपूर्वक झाडे लावून, त्यांना जगवणे गरजेचे आहे याची जाणीव आता जनमानसात होऊ लागली आहे. अनेक लोक स्वयंस्फूर्तीने झाडे लावतात पाणी घालून त्यांना जागवण्याचा प्रयत्न करतात. पण वृक्षारोपणाचे शास्त्रीय ज्ञान त्यांना असतेच असे नाही कोणती झाडे कुठे, कधी आणि कशी लावावीत याचे मार्गदर्शन करण्यासाठी झाडे लावणाऱ्या साऱ्यांचे एकत्रीकरण व्हावे म्हणून पर्यावरण दक्षता मंडळाने  “हिरव्या हातांचे संमेलन” या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

दिनांक :  २३ मार्च २०१९

वेळ : सकाळी  १०:००-१२. ०० वाजता 

ठिकाण : मराठी ग्रंथ संग्रहालय , स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम)
 
अधिक माहितीसाठी संपर्क : ३, पर्यावरण शाळा, काका सोहोनी पथ, घंटाळी, ठाणे (प) ०२२-२५३८०६४८ / ९८६९०३३५८३